breaking-newsटेक -तंत्र

सात सीटर Renault Triber, Kwid लाँच मात्र किंमतीत वाढं…

रेनॉल्टने भारतीय बाजारात BS6 मानांकनामध्ये दोन लोकप्रिय कार लाँच केल्या आहेत. यामध्ये स्वस्तातली सात सीटर एमपीव्ही Renault Triber आणि मारुतीच्या अल्टोला टक्कर देणारी मिनी एसयुव्ही Kwid चा समावेश आहे. या कार अपडेट केल्याने किंमतीही वाढल्या आहेत. 

बीएस ६ इंजिनची ट्रायबर या कारची एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपये आहे. कंपनीने ट्रायबरच्या किंमतीमध्ये चार ते 29 हजार रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही कंपनीने किंमत वाढविली होती. तर लवकरच एएमटी व्हेरिअंटही लाँच केले जाणार आहे. यासोबत 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनची कारही लाँच केली जाणार आहे. 


दोन्ही कार काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत. परंतू नवीन इंजिन आल्याने किंमती वाढल्या आहेत. क्वीडची किंमत 9 हजार रुपयांनी वाढविण्यात आली आहे. 

तर क्वीड ही कार दोन इंजिनमध्ये उपलब्ध आहे. 0.8 लीटर आणि 1.0 लीटर इंजिन देण्यात आली आहेत. या बीएस 6 च्या इंजिनला बीएस 4 चीच ताकद असणार आहे. 1.0 मध्ये अॅटो गिअरबॉक्स मिळेल. तर 0.8 मध्ये केवळ मॅन्युअल गिअरबॉक्स मिळणार आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button