राजकारणराष्ट्रिय

रोहित पवारांचं खोचक ट्वीट; केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत

पुणे: देशात पेट्रोल- रोहित पवार नेहमीच आपली आभासपूर्वक आणि मुद्देसूद ट्विट साठी चर्चेत असतात, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी असेच मोदी प्रति आभाराचे ट्विट केले आहे, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढीमुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. तर, विरोधी पक्ष नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. काँग्रेसनंही राज्यभरात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं होतं. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही खोचक टीका केली आहे.

 

 

रोहित पवारांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत. पण काही का असेना. यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, असं खोचक ट्वीट त्यांनी केलं आहे.

 

 

रोहित पवार ट्विटरवर काय म्हणाले?

महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत!

 

पण काही का असेना… यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button