breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

देशभरात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांनी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या आहेत. गुजरातमधून ८५३ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, नंतर पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक आहे.

गुजरातला ८५३ ट्रेन मिळाल्या असून महाराष्ट्रातून ५५० ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. तर पंजाबमधून ३३३, उत्तर प्रदेशातून २२१ आणि दिल्लीमधून १८१ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांसाठी सर्वाधिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश (१२४५) पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे बिहार (८४६), झारखंड (१२३), मध्य प्रदेश (११२) आणि ओडिशाचा (७३) क्रमांक आहे.

राज्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे रेल्वे मंत्रालयकडून श्रमिक ट्रेन पुरवल्या जात आहेत. या ट्रेनसाठी येणारा ८५ टक्के खर्च रेल्वे उचलत असून उर्वरित खर्च राज्य सरकारं उचलत आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ट्रेन आपल्या निर्धारित ठिकाणी न पोहोचता भरकटत असल्याचं समोर आलं आहे. त्यासंबंधी रेल्वेने सांगितलं आहे की, “बिहार आणि उत्तर प्रदेशच्या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे धावत आहेत. सोबतच वैद्यकीय तपासणी होत असल्याने टर्मिनलकडून हिरवा कंदील मिळण्यास उशीर होतो. ही सर्व जबाबदारी राज्य प्रशासनाची आहे. राज्य सरकारसोबत चर्चा करत ही समस्या सोडवण्यात आली आहे. सोबतच प्रवासासाठी इतर व्यवहार्य मार्गांचा शोध घेतला जात आहे”.

१ मे रोजी पहिली श्रमिक ट्रेन चालवली तेव्हा फक्त चार ट्रेन चालवण्यात आल्या ज्यामध्ये चार हजार प्रवासी होते. २० मे रोजी सर्वात जास्त २७९ ट्रेन चालवण्यात आल्या. त्यावेळी चार लाख लोकांनी प्रवास केला. १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेनमधून प्रवास केलेल्यांमध्ये ८० टक्के प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button