ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘युवकांनो दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करू नका’; समुपदेशक डॉ. स्मिता जोशी

पिंपरी : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयातील “लैंगिक छळ विरोधी आणि लिंग संवेदना” समितीच्या वतीने “दिवस तुझे फुलायचे” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन समुपदेशक तज्ञ डॉ. सागर पाठक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. एक दिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, संयोजिका डॉ. अनुराधा घोडके, समुपदेशक डॉ. स्मिता जोशी, श्रद्धा सरदेशमुख, रश्मी उंगार्लेकर, प्रतिभा राणे, प्रा. अपर्णा जोशी आदी उपस्थित होते.

समुपदेशक डॉ. स्मिता जोशी नातेसंबंध अपेक्षा आणि वास्तव या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, विद्यार्थीनींनो शिक्षणाबरोबरच मौज मजा करताना मनात अनेक भाव असतात. काही गोष्टी मैत्रिणीबरोबर शेअर करतात. महाविद्यालयीन जीवनात अनेकवेळा ओळखीचे रूपांतर प्रेमात होते. अशावेळी प्रसंगी आपण आई-वडिलांची दिशाभूल करतो. त्यांच्याबरोबर खोटे बोलतो, पुढे आपल्या नातेवाईकांनाच अंधारात ठेवून लग्नही करण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. समाजात काही तरूणात आगतिकता आहे, ते हेरून मुलींचा गैरफायदा घेतात पुढे स्वभावाची ओळख न पटल्यामुळे लग्ने तुटतात. आज शिक्षण घेत असतानाच भावी आयुष्याचाही सारासार विचार सजगपणे प्रत्येकाने करा मैत्री करताना विचारपूर्वक करा, इतर मित्राच्या साथसंगथीत स्वतःचे जीवनात नैराश्य येणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्या व याची मनात खुणगाठ बांधावी भविष्यात होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा. प्रेम वाईट नाही, परंतु, त्याकडे डोळसपणे पहा, प्रसंग ओढवल्यावर सर्व प्रकार समोर येतात आई-वडीलांना कल्पनाही नसते असे प्रकार करू नका. प्रसंगी चर्चा करून समाधान शोधा जीवनात यशस्वी होण्याच्या मार्गावर चालत रहा. मुले जीवनसाथी निवडताना सारासार विचार करा, मुलीदेखील काही प्रमाणात मुलांची काही प्रमाणात फसवणूक करतात. असे असले तरी, समाजात आजही आरोप स्त्रीयांवरच होतात.

समुपदेशक डॉ. सागर पाठक, ‘प्रेम आकर्षण व लैंगिकता’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, मुलांचे एकतर्फी प्रेम असेल तर शेवटी पदरी निराशाच येते. एखादी गोष्ट आवडते म्हणजे दिसणे, गायन, वादन अनेक प्रकारची ती असू शकते. त्यात आकर्षण असते. तुम्ही अभ्यास बरोबरच तुमच्या अंगी असलेल्या सुप्त कला, गुण, आवडता खेळ, गायन, वादन क्षेत्रात चमक दाखविली तरच; इतर तुमच्याकडे आकृष्ट होतील. प्रेम प्रत्येकाला हवहव वाटत असलं तरी प्रेम तुटल्यावर काय परिणाम होतील. या विचारही शिक्षण घेताना प्रत्येकाने केला पाहिजे. आई-वडीलांच्या अपेक्षा व स्वतःच्या ध्येयापासून दूर जावू नका. भावनिक प्रेम टाळावा ते करू नका. त्यातून निराशाच पदरी पडते. यात आयुष्यच उद्धस्त होण्याचीच शक्यता अधिक असते.

प्रथम व्यक्ति कोण, कशी आहे हे जाणून घ्या. आपल्यात सहनशीलता नसेल तर चुका करू नका. शैक्षणिक जीवनात आकर्षण असते. तरी लैंगिक आकर्षणापासून दूरच रहा. प्रेम म्हणजे लैंगिक आकर्षण नाही, असा कोणी आग्रह करत असेल तर त्यांच्यापासून दूर रहा, व्यसनापासून दूर राहून नियमित व्यायाम करून आपले आरोग्य उत्तम ठेवा, आत्मसात करा, फायद्या-तोट्याचा विचार करा, मन प्रसन्न ठेवा, एकमेकांच्या मदतीसाठी पुढाकारा घ्या. अशातूनच स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ति मिळेल. मैत्रीत बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवा.

यावेळी लग्न करावे, करू नये आदींबाबत खुली चर्चा झाली. त्यात अनेकांनी आपली मत खेळी मेळीच्या वातावरणात मांडली.
दुसर्‍या सत्रात महविद्यालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना जीवनशैली, आव्हाने याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा निर्मुलनचे डॉ. मिलिंद देशमुख यांनी विद्यार्थ्यांमध्ये आज अचुक विचारांची पेरणी अशा कार्यक्रमाद्वारे करण्यात येते ही कौतुकास्पद बाब आहे. भावी आयुष्यात जोडीदार कसा असावा, जात, धर्म, अंधश्रद्धामध्ये अडकू नका. याबाबत सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.

उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी प्रास्ताविकात म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी समृध्दजीवन जगावे, वेळीच सावधान व सजग व्हावे. कर्तव्यापासून दूर राहू नये. यासाठी या कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आले. त्यासाठी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे व खजिनदार डॉ. भूपाली शहा यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन संयोजिका डॉ. अनुराधा घोडके यांनी केले, प्रा. अपर्णा जोशी यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button