ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

देशातील मंदिरांवरीलही भोंगे हटवा, परंतु आधी ; राज ठाकरेंचे देशभरातील हिंदूंना ‘हे’ आवाहन

औरंगाबाद| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या जाहीर सभेत अपेक्षेप्रमाणे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घालत सरकारला आपण दिलेल्या अल्टिमेटमची आठवण करून दिली. आज एक तारीख असून उद्या दोन आणि परवा तीन तारीख आहे. तीन तारखेला ईद आहे. मला यांच्या सणामध्ये विष कालवायचे नाही. परंतु, मी ४ तारखेपासून ऐकणार नाही. ४ तारखेला मला सगळीकडे हनुमान चालीसा ऐकू आलाच पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार देशातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले पाहिजेत, मग यात मंदिरांवर असलेले भोंगे देखील उतरले पाहिजेत, मात्र आधी मशिदींवर असलेले भोंगे उतरल्यानंतरच मंदिरांवरील भोंगे उतरतील, अशी भूमिका घेत आपण कायद्याचे पालन करणारे नेते असल्याचे राज ठाकरे यांना आज अधोरेखित केले.

आपल्या भाषणात राज ठाकरे पुढे म्हणाले की, माझी महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की, जेथे जेथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने तुमची हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. विनंती करून जर समजत नसेल तर आमच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही. लाउडस्पीकर तुमच्या धर्मामध्ये बसत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे नियम पाळले गेलेच पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पोलिसांकडून रितसर परवानगी घेऊनच हनुमान चालिसा लावा- राज ठाकरे

देशातील हिंदू धर्मियांना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा वाजवण्याचे आवाहन करताना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना कायद्याचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘अभी नही, तो कभी नही’ आज ही परिस्थिती आहे. सर्वांना हिंदू बांधवाना माझी विनंती आहे की ३ तारखेपर्यंत हे ऐकले नाहीत, तर ४ तारखेला सगळीकडे हनुमान चालीसा मला ऐकू आलेच पाहिजे. पोलिसांकडून रितसर परवानगी घ्या. ही परवानगी घेऊनच हे काम कराल आणि हा प्रश्न कायमचा निकाली लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button