breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

ऑनलाईन पेमेंटसाठी ‘आरबीआय’चा नवा नियम

नवी दिल्ली – पेमेंट अॅग्रीगेटर आणि ई-कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांच्या बँकेच्या माहितीची साठवणूक करण्यापासून रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) नवे नियम आणण्याची तयारी करत आहे. या नव्या नियमांमुळे ग्राहकांना डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करताना आपल्या कार्डचा १६ अंकी क्रमांक आणि इतर माहिती दरवेळी भरावी लागणार आहे. अर्थात, ‘सेव्ह कार्ड डिटेल्स’ हा पर्याय बंद होण्याची शक्यता आहे.

डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा क्रमांक १६ अंकी असतो. ऑनलाइन पेमेंट करताना अनेक वेळा संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर एकदा कार्डचा क्रमांक, एक्स्पायरीची तारीख आणि सीव्हीव्ही क्रमांक भरला की ‘सेव्ह कार्ड डिटेल्स’ असा पर्याय येतो. त्याद्वारे पुढील व्यवहारावेळी ही सर्व माहिती पुन्हा भरावी लागत नाही. मात्र, आपल्या कार्डची माहिती संबंधित संकेतस्थळावर, म्हणजेच कंपनीकडे साठवली जाते. रिझर्व्ह बँकेचा सुधारित नियम पेमेंट अॅग्रीगेटर्स आणि ई-कॉमर्स मर्चंटला ग्राहकांच्या कार्डची माहिती सर्व्हर किंवा डेटाबेसमध्ये साठवून ठेवण्यापासून रोखू शकतात. मात्र, त्यासाठी ग्राहकांनाही प्रत्येक ऑनलाइन व्यवहारासाठी कार्डची सर्व माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने डेटा स्टोरेज धोरणावर आपल्या काही प्रस्तावित मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत, ज्या जानेवारी २०२२ पासून लागू होऊ शकतात.

फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न –

सध्या ग्राहक ऑनलाईन संकेतस्थळावर दुसऱ्यांदा पेमेंट करत असेल तर केवळ सीव्हीव्ही आणि ओटीपी टाकणे आवश्यक असते; कारण कार्डवरील इतर माहिती ऑनलाईन संकेतस्थळांवर सेव्ह होत असते. याद्वारे ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते. ते रोखण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.आरबीआयने यासंबंधित पेमेंट गेटवे कंपन्याचा प्रस्ताव नाकारला आहे, ज्यात ग्राहकांच्या कार्डसंबंधित माहिती त्यांच्या सर्व्हरवर साठवून ठेवण्याची परवानगी मागण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button