breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रियलेख

आरबीआयने चौथ्यांदा वाढवला व्याजदर, गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार

RBI hikes interest rates for fourth time, all types of loans including home loans will become more expensive

  • रेपो दरात कोणताही बदल केल्यास गृहकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो

नवी दिल्ली । महाईन्यूज ।

आरबीआयने सलग चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. रेपो दरात वाढ केल्यास बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे. ते कर्ज बँका ग्राहकांना देतील आणि त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. बँका देऊ करत असलेली नवीन किरकोळ कर्जे बाह्य बेंचमार्कशी जोडलेली असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, ते रेपो दराशी जोडलेले असते. यामुळेच रेपो दरात कोणताही बदल केल्यास गृहकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो.

रेपो दरात वाढ झाल्याने आता गृहकर्जाचा हप्ता ही वाढला आहे. तसेच, एमसीएलआर, बेस रेट आणि बीपीएलआरशी जोडलेल्या जुन्या गृहकर्जांवरही त्याचा परिणाम होईल. मे महिन्यापासून रेपो दरात १९० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे.
RBI Repo Rate: ऐन सणासुदीच्या काळात कर्ज आणखी महाग होणार; RBIकडून रेपो रेटमध्ये वाढ

रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम गृहकर्जाच्या ईएमआयवर

रेपो रेट वाढल्यामुळे गृह कर्जाचे ईएमआय अधिक महाग होतील. ज्या बँकेकडून तुम्ही गृहकर्ज घेतले आहे, त्या बँकेचा गृहकर्ज दर पूर्वी ८.१० टक्के होता आणि तुम्ही हे कर्ज २० वर्षांच्या कालावधीसाठी घेतले आहे. अशा परिस्थितीत, पूर्वी तुम्हाला ३० लाख रुपयांच्या कर्जावर २५,२८० रुपये ईएमआय भरावे लागत होते, परंतु आता तुम्हाला २६,२२५ रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, जर तुमचे कर्ज ५० लाख रुपये किंवा १ कोटी रुपये असेल, तर चार्टमध्ये पहा की तुम्हाला पूर्वीच्या तुलनेत आता किती पैसे भरावे लागतील.

गृहकर्ज रक्कमव्याज दर (%मध्ये)कालावधी (वर्षे)सध्याचा हफ्ता (रु. मध्ये)नवे व्याज दर (% मध्ये)वाढलेला हफ्ता (रु. मध्ये)
३० लाख८.१०२०२५,२८०८.६०२६,२२५
५० लाख८.१०२०४२,१३४८.६०४३,७०८
१ करोड८.१०२०८२,२६७८.६०८४,४१६

रेपो रेटचा ईएमआयवर कसा परिणाम होतो

यावेळी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.५० टक्के वाढ केली आहे. रेपो दर वाढल्याचा सरळ अर्थ असा आहे की, बँकांना रिझर्व्ह बँकेकडून जास्त दराने कर्ज मिळेल. अशा परिस्थितीत, बँका ही वाढ ग्राहकांना हस्तांतरित करतात, ज्यामुळे त्यांच्यासाठी कर्जाचे दर देखील महाग होतात. यामुळे केवळ नवीन कर्जे महाग होतातच सोबतच पूर्वीपासून चालू असलेले गृहकर्ज किंवा वाहन कर्ज यांचा ईएमआयही वाढतो. याचा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयवर परिणाम होणार नसला तरी नवीन वैयक्तिक कर्जे महाग होतील.

ऑक्टोबरपासून EMI चं ओझं वाढणार! मुख्य पॉलिसी दर तीन वर्षांच्या उच्चांकावर

जर एखाद्याने सात वर्षांसाठी ८ लाखांचे वाहन कर्ज घेतले असेल तर व्याजदर ११ टक्क्यांवरून ११.५० टक्क्यांपर्यंत वाढेल. यामुळे १३,६९८ रुपयांवरून १३,९०९ रुपयांपर्यंत हप्ता वाढेल. म्हणजेच कर्ज २११ रुपयांनी वाढणार आहे. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने पाच वर्षांसाठी ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर त्याचा व्याजदर १५ टक्क्यांवरून १५.५० टक्के होईल. त्याला आता ११,८९५ रुपयांऐवजी १२,०२७ रुपये द्यावे लागतील. म्हणजेच त्याचा मासिक हप्ता १३२ रुपयांनी वाढणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button