breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेची कारवाई योग्यच पण पालकांची तक्रार गैरसमजातून: द गुड समॅरिटन स्कुल

पिंपरी । प्रतिनिधी

अनवधानाने शाळा आवारात विक्रेत्याला पुस्तक विक्रीस सहमती दिल्याने शिक्षण मंडळाने केलेली कारवाई योग्य आहे मात्र आरटीआय कार्यकर्त्याची तक्रार आणि वागणूक चुकीची होती इथूनपुढे नियमबाह्य कुठलीही ल्याही साहित्य विक्री येथे होणार नाही, असे स्पष्टीकरण द गुड समॅरिटन शाळेने दिले.

शाळा पालकांना फी साठी तगादा लावत असून शाळेत पुस्तक विक्री सुरू आहे. खरेदीसाठी पालकांना सक्ती केली जात असल्याची तक्रार एकाने महापालिकेच्या शिक्षण मंडळाला केल्याने येथे कारवाई करीत पुस्तके ठेवण्यात आलेल्या दोन वर्ग खोल्या सील करण्यात आल्या होत्या या पार्श्वभूमीवर आपली बाजू मांडण्यासाठी शाळेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. परीषदेला मुख्याध्यापक आशिष गायकवाड, पर्यवेक्षिका डॉ निकिता गायकवाड, पालक प्रतिनिधी शोभा चव्हाण, माजी विद्यार्थी व नगरसेवक ऍड सचिन भोसले, शैलेश देशमुख यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.

पालक आणि शाळा प्रशासनात उत्तम समन्वय आहे.  कोरोनामुळे पालकांच्या विनंती वरून आम्ही येथे विक्रेत्याला जागा उपलब्ध करून दिली होती मात्र कुठल्याही पालकांना पुस्तक खरेदीसाठी तगादा लावला नाही १-२ पालकांच्या गैरसमजुतीतून हा सर्व प्रकार झाला आहे मात्र त्यांचाही गैरसमज आम्ही दूर करू मात्र आरटीआय कार्यकर्त्याने पालक नसताना पालक म्हणून खोटी तक्रार केली शाळा आवारात येऊन शिक्षकांसोबत उद्धट वर्तन केले. याचा आम्ही निषेध करतो.

आशिष गायकवाड- मुख्याध्यापक

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालकांच्या विनंती वरून येथे पुस्तक विक्रेत्याला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र पालकांना ते खरेदी करण्यासाठी तगादा लावला नाही.

शोभा चव्हाण – (पालक प्रतिनिधी)

पालकांच्या मागणीनुसार सर्वांना एकाच ठिकाणी पुस्तके उपलब्ध व्हावेत म्हणून आमच्या पिटीए बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला मात्र त्याची सक्ती कोणावरही नव्हती. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button