breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरच्या १२ अतिरेक्यांना वाचवलं’; राम सातपुतेंचा गंभीर आरोप

सोलापूर | सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी लढत जाहीर झाल्यापासून दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. माझ्या वडिलांवर टीका करू नका असं म्हणणाऱ्या प्रणीती शिंदेंना राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

राम सातपुते म्हणाले की, २००२ मध्ये सरकारने पोटा नावाचा दहशतवादाला प्रतिबंध करणारा कायदा केला होता. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये या पोटा कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या १२ अतिरेक्यांना वाचवलं आणि लांगुलचालनाचं राजकारण केलं. ज्या बारा अतिरेक्यांना त्यांनी सोडलं त्यांची यादीही माझ्याकडे आहे. सोलापूरचा विकास केला नाही, ते भकास केलं आणि दक्षिण अफ्रिकेत स्वतःचे चहाचे मळे शिंदेंनी सुरु केले.

हेही वाचा     –      एप्रिलमध्ये OTT वर प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट, वेब सीरिज

महिन्यातून दोन दिवस मतदारसंघात यायचं, फोटो काढायचे, तेच फोटो पंधरा दिवस दाखवत भेटी दिल्याचं सांगायचं हेच काम ताईंनी (प्रणिती शिंदे) केलं आहे. असले धंदे मी करत नाही. आजवर ७५ वर्षांता कुणीही हिंदूना आतंदकवादी म्हणण्याचं काम केलं नव्हतं ते सुशीलकुमार शिंदेंनी केलं. सुशील कुमार शिंदे म्हणजे सोवापूरचा कलंक आहेत अशीही टीका राम सातपुते यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button