breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

एप्रिलमध्ये OTT वर प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट, वेब सीरिज

OTT : ओटीटीवर कधी कोणता नवीन चित्रपट किंवा वेब सीरिज स्ट्रिम होईल, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. येत्या एप्रिल महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक रंजक चित्रपट आणि वेब सीरिज येणार आहेत.

क्रुक्स- हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या 4 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. एका अमूल्य नाण्यामुळे संपूर्ण युरोपाच्या शत्रूगटात कशी फूट पडते, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

 

अमर सिंह चमकीला- दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांचा ‘अमर सिंह चमकीला’ हा चित्रपट 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. निर्माते आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा हा चित्रपट अमिर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

 

पॅरासाइट द ग्रे- या चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये दाखवण्यात आलंय की कशाप्रकारे काही अज्ञात पॅरासाइट हिंसक पद्धतीने माणसावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. 5 एप्रिल रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – ‘…म्हणून अरविंद केजरीवाल यांना अटक केली’; उद्धव ठाकरे यांचा खळबळजनक आरोप

हनुमान- तेजा सज्जाची मुख्य भूमिका असलेल्या ‘हनुमान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 40 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला होता. आता ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 5 एप्रिलपासून पाहता येणार आहे. झी 5 वर या चित्रपटाचे कन्नड आणि मल्याळम व्हर्जन उपलब्ध असतील तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर तमिळ व्हर्जन पहायला मिळेल.

 

फर्रे- सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्रीचा पहिलावहिला चित्रपट ‘फर्रे’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 एप्रिल रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

विश- हा एक अॅनिमेटेड चित्रपट असून येत्या 3 एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

 

ब्लड फ्री- गूढ आणि मनोरंजनने परिपूर्ण असा हा थ्रिलर के-ड्रामा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 10 एप्रिलपासून याचे एपिसोड्स प्रेक्षकांना पहायला मिळतील.

 

अदृश्यम- दिव्यांका त्रिपाठीची थ्रिलर सीरिज ‘अदृश्यम’ सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत एजाज खानची मुख्य भूमिका आहे. या सीरिजचे 65 एपिसोड्स असून त्याचं दिग्दर्शन सचिन पांडेनं केलंय. येत्या 11 एप्रिल रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button