breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात डोळ्यांची साथ पसरतेय, अशी आहेत लक्षणे? काय काळजी घ्यावी?

Eye Flu : राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. ॲडिनो विषाणूमुळे डोळे येत असून राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. अशावेळी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. रुग्णांनी डोळे आल्यास डोळे थंड पाण्याने धुवावे, तसेच अशा व्यक्तींनी रुमाल, टावेल स्वतंत्र वापरावा. सार्वजनिक ठिकाणी स्पर्श करू नये असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

डोळे येण्याची लक्षणे :

  • डोळे लाल होणे
  • वारंवार पाणी येणे
  • डोळ्याला सूज येणे
  • डोळे कचकच करणे
  • किंचित अंधूक दिसणे

हेही वाचा – संभाजी भिडे यांच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले..

अशी घ्या काळजी..

  • वैयक्तिक स्वच्छता ठेवने
  • वारंवार हात धुणे
  • वारंवार डोळ्यांना हात न लावणे
  • डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडणे
  • परिसर स्वच्छ ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे
  • नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन लवकरात लवकर उपचार करणे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button