breaking-newsपुणे

विनयभंगाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

पुणे | महाईन्यूज| प्रतिनिधी

एलसीडी टीव्हीचे हफ्ते घेण्यासाठी घरी बोलावून एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या खटल्यातून एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी नुकताच हा निकाल दिला.

आरोपीच्या वतीने ऍड. विशाल विजयराव बर्गे यांनी कामकाज पहिले. संग्राम रणधीर भोसले, असे निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नाव आहे. बारामती पोलीस ठाण्याचे एएसआय सदाशिव मोहिते यांनी या प्रकरणाचा तपास केला. याबाबत एका विवाहित महिलेने २ मे २०१७ रोजी बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पीडितेच्या जावयाने बारामती येथील एका इलेकट्रॉनिक दुकानातून मासिक हफ्त्यांवर एलसीडी टीव्ही घेतला होता. त्याचा मासिक हफ्ता घेण्यासाठी आरोपी भोसले याने घरी बोलावले आणि घरात विनयभंग केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. या प्रकरणी बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. आर. वाघोले यांच्या न्यायालयात खटला सुरु होता.

या खटल्याची अंतिम सुनावणी नुकतीच झाली. यामध्ये पीडितेने केलेले आरोप आणि त्यासाठी सादर केलेले पुरावे व तिचा पती, मुलगी आणि जावई यांनी दिलेली साक्ष न्यायालयात टिकू शकली नाही. या उलट आरोपीच्या वकिलांनी पीडित महिलेला यापूर्वी करमाळा (जि. सोलापूर) येथे खंडणीच्या गुन्ह्यात शिक्षा झाली असून तिच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले. त्याचबरोबर पीडिता कथित समाजसेविका असून तिचे बारामती पोलीस ठाण्यात सतत येणे -जाणे असते. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यासाठी तिने विलंब का लावला, आदी मुद्दे न्यायाधीशांच्या निर्दशनास आणून दिले. त्याच बरोबर पीडित महिला व तिच्या घरातील इतर सदस्यांचे जाब-जबाबात विसंगती असल्याचेही ऍड. बर्गे यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. या माध्यमातून आरोपी संग्राम भोसले याच्यावर केलेले आरोप खरे नसल्याचे न्यायालयाला पटवून दिले. तसेच पांडुरंग भगवंत विरुद्ध महाराष्ट्र सरकार या मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याचा दाखला देत एखादी महिला खोटा खटला दाखल करून स्वतःचे चारित्र्य उघडयावर आणणार नाही. हा नियम अशा प्रकारच्या खटल्यास लागू पडणार नाही, हे मुंबई उच्च न्यायालयाचे अनुमान सादर करीत आरोपी भोसलेवर केलेला विनयभंगाचा आरोप खोटा असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला.

अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायधीश पी. आर. वाघोले यांनी आरोपीची विनयभंगाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button