breaking-newsकोकणताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज ठाकरे यांचा डाव, फडणवीसांची खेळी, शिंदे यांचा बाउन्सर, महायुतीचे तिन्ही पक्ष कोकणात समोरासमोर

Padvidhar vidhan parishad election 2024 : लोकसभा निवडणूक निकालाबरोबर आणखी एक निवडणूक रंगणार आहे. आता ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी नसणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष आणि महायुतीचे पक्ष समोरासमोर आले आहे. लोकसभा एकत्र लढवणार हे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहे. कोकणात महायुतीमधील तिन्ही पक्षात समाना रंगणार आहे. कोकण विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून रोजी होत आहे. या निवडणुकीत मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना समोरासमोर आली आहे.

मनसेने कोकणातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार जाहीर करुन टाकला. शिवसेनेने संजय मोरे यांना उमेदवारी दिली. यामुळे कोकणात शिवसेना, भाजप आणि मनसे या महायुतीमधील तीन पक्षात लढत होणार आहे.

हेही वाचा  –  अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी ७० तरुण महाराष्ट्रात, मुंबई पोलीसांचा मोठा खुलासा 

भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणूक एकत्र लढले. त्यानंतर दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यावर राज ठाकरे यांची मनसेही महायुतीत आली. भाजपचे आमदार असलेल्या या जागेवर आधी मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. पानसे यांना मनसे उमेदवारी दिल्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांचे तिकीट कापले जाणार की काय? अशी चर्चा सुरु झाली. परंतु भाजपने त्यांचे तिकीट जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनाही कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली. यामुळे महायुतीमधील पक्षातच तिरंगी लढत होत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली वेगळी वाट धरली. परंतु शिवसेना आणि भाजप उमेदवार समोरासमोर आले आहे. यामुळे लोकसभा निकालापूर्वी कोकणात चर्चा रंगली आहे.

कोकण पदवीधर मतदार संघ हा भाजपचा मतदार संघ आहे. भाजपचे निरंजन डावखरे दोन वेळा या ठिकाणावरुन आमदार झाले आहेत. यामुळे भाजप या जागेवरुन आपला हक्क सोडू इच्छित नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button