ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमहिला दिनविदर्भ

राज सभेला असा असणार पोलिसांचा बंदोबस्त; इतर जिल्ह्यांतून मागवला जाणार फौजफाटा

औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर गुरुवारी रात्री उशिरा परवानगी मिळाली आहे. यानंतर राज ठाकरे यांची १ मे रोजी सभा होणार, हे अधिकृरित्या स्पष्ट झाले आहे. आता या सभेसाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलिसांसह इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. सोबतच एसआरपीएफच्या तुकड्या सुद्धा मागवण्यात आल्या आहेत.

राज ठाकरेंच्या सभेच्या बंदोबस्तासाठी ३ डीसीपी ६ एसीपी, ३० पीआय, इतर ३०० अधिकारी आणि २ हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात असतील. सोबतच औरंगाबाद ग्रामीण, जालना, अहमदनगर, पुणे यासह गरज पडल्यास इतर जिल्ह्यांमधूनही पोलिसांची कुमक मागवली जाण्याची शक्यता आहे. तसेच काही एसआरपीएफच्या तुकड्या सुद्धा तैनात करण्यात येणार आहे. तसेच सीआयडीचं एक विशेष पथक सभेआधीपासून सभा संपल्यानंतरपर्यंत विशेष लक्ष ठेवून असणार आहे.

सभेच्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर….

पोलिसांच्या बंदोबस्तबरोबरच सभेच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात १० ते १५ विशेष एचडी कैमरे लावण्यात आले असून यावरून पोलीस सभेच्या परिसरावर लक्ष ठेवणार आहे. तसेच याच परिसरात साद्या पोशाखात पोलीस कर्मचारी सुद्धा सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button