breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सार्वजनिक गणेश मंडळांनाच्या मदतीने कोरोनाबाबत जनजागृती करा : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने आत्तापर्यंत हजारो बळी घेतले आहे. अजूनही कोरोना रुग्ण सापडत असल्याने धोका पूर्णपणे टळला नसून, तिसऱ्या लाटेचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच गणेशोत्सवात हा धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि गणेश मंडळांनी एकत्र येऊन जनजागृती करावी अशी सूचना स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

गुरूवारी (दि.२) आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ प्रभाग समितीच्या मासिक सभेत यादव यांनी सूचना केल्या.यावेळी सभापती कुंदन गायकवाड, सदस्य संतोष मोरे, उत्तम केंदळे, सचिन चिखले, योगिता नागरगोजे, कमल घोलप, पौर्णिमा सोनवणे, साधना मळेकर, स्विनल म्हेत्रे आदी उपस्थित होते.सभेत सर्व सदस्यांनी शहराच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. यावेळी यादव म्हणाले कोरोनामुळे शहराने अनेक नागरिक गमावले आहेत. अजूनही शहरात रुग्ण सापडत असून बळीही जात आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्वस्थ बसून चालणार नाही. तसेच विविध उपाययोजना करणेही क्रमप्राप्त आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आला असून पिंपरी चिंचवडकरांना याबाबत विशेष आकर्षण असते. शहरात शेकडो गणेश मंडळे असून ते सामाजिक कार्यासाठी उत्साही असतात. यामुळे गणेशत्सवाचे औचित्य साधून मंडळांना सोबत घेऊन जनजागृतीपर कार्यक्रम राबवता येईल. मंडळांच्या साथीने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचून प्रभावीपणे जनजागृती करता येईल. तसेच हा समितीचा वेगळा उपक्रम ठरेल. याच धर्तीवर पूर्ण शहरातही उपक्रम राबवला जाऊ शकतो. याबाबत सदस्य सकारात्मक असून या पद्दतीने काम केल्यास कोरोना हद्दपार करण्यास मदत होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button