breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल
कोल्हापूर – गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी आता 33 फुटांपर्यंत पोहोचली असून नदीची इशारा पातळी 39 फुट, तर धोका पातळी 43 फुट आहे. दरम्यान, राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे पंचगंगेची वाढती पाणी पातळी लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही मार्गांवरील वाहतूकदेखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.