breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
#RainAlert: महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लवकरच संपणार मात्र आज मध्य महाराष्ट्रात वादळी वा-यासह पावसाची शक्यता- हवामान विभाग
पुणे: महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज वादळी वा-यासह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविलेला आहे. तर उद्यापासून पावसाचा राज्यातील जोर कमी होणार असून लवकर मान्सूनची माघार सुरु होईल असे IMD ने सांगितलेले आहे.