breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

एल्विश यादववर गुन्हा दाखल, रेव्हा पार्टीत सापाचे विष पुरवल्याचा आरोप

Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एल्विशने एका रेव्हा पार्टीत सापाचे विष आणि परदेशी मुली पुरवल्याचा आरोप आहे. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, नोयडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ गारूडींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आले आहे. त्यांनी सांगितलं की ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे. याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – २ हजार रुपयांच्या नोटा पोस्टाद्वारे रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात पाठवता येणार, RBI ची माहिती

तक्रारीनुसार, माहिती देणाऱ्याने राहुलशी एल्विशच्या नावाने बोलताच त्याने रेव्ह पार्टी आणि इतर व्यवस्था करण्यास होकार दिला. माहिती देणाऱ्याने त्याला नोएडाच्या सेक्टर ५१ मध्ये असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये बोलावले आणि डीएफओ नोएडा आणि पोलिसांना याची माहिती दिली. राहुल व इतर लोक तिथे पोहोचले. त्याने सोबत ९ सापाचे विष आणले होते. दरम्यान, पोलिसांनी तिथे पोहोचून सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एल्विश यादवसह सहा आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button