breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब

पुणे : पुणे शहराच्या वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब झाल्याचे पाहायला मिळाले. हवेतील अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर २.४) अधिक आहे.

मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १४६ वर तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १७८ वर गेला आहे. हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थिती जात असल्याचा अनेक संस्थांचा अभ्यास आहे.

हेही वाचा – कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुण्यातील लोहगावमधील हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ आणि आळंदीत एक्यूआय (AQI- Air Quality Index) २३२ वर गेला आहे. हिवाळ्यात पूर्वेकडून वाहणारे वारे, सोबतच वाऱ्यांचा वेग देखील कमी असल्याने मुंबईसह पुण्यातील हवा गुणवत्ता खालवली आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था, सुरु असलेली बांधकामं, मेट्रोची कामं यामुळे धुळीच्या कणांमुळे मोठी भर पडली आहे हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा, टीबी, केंसर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा आणि हृदय रोगांच्या रुग्णांना त्रास वाढतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button