breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांचे ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आभार !

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडकरांच्या कररुपी पैशातून होणार ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मदत केल्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रति महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याद्वारे कामठे यांनी ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’चा आदर्श पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घालून दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छतेच्या कामात बोगस बँक गॅरंटी आणि बनावट कागदपत्रे सादर करुन तब्बल ५५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा प्रयत्न भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी हाणून पाडला. यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून कलाटे यांनी स्वपक्षासह महापालिका प्रशासन आणि आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत संघर्ष करावा लागला. पिंपरी-चिंचवडकरांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेर कामठे यांना वारंवार आंदोलन करावे लागले. प्रशासनावर राजकीय दबाव आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौराचा हस्तक्षेप यावरुन हे प्रकरण चांगलेच गाजले.

स्थानिक पातळीवर दाद मिळाली नाही. त्यामुळे नगरसेवक कामठे यांनी थेट प्रदेश पातळीवर या भ्रष्टाचाराला वाचा फोडली. भाजपा प्रदेश पातळीवरील नेत्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली.

‘‘ जे चूक आहे चूकच आहे. मग भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे. मग, तो कोणी का असेना…’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाची यंत्रणा जागी झाली आणि सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट या कंपनीवर गुन्हा दाखल झाला. याबाबत नगरसेवक तुषार कामठे यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बोगस एफडीआरव्दारे अनेक ठेकेदारांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. रस्ते व गटार सफाईचे पन्नास कोटी रुपयांचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराने त्यापोटी दिलेली सहा कोटी नव्वद लाख ७१ हजार रुपयांची बॅंक गॅरंटी बोगस निघाली. मात्र, महापालिका आयुक्त हे संबंधित ठेकेदारवर कारवाई करत नव्हते. याबाबत भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून संपुर्ण गा-हाणे मांडले. त्यावर आयुक्तांना तत्काळ दोषीवर कारवाई करायला सांगितले.  त्यामुळे पालिकेने या कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला. यावरच भाजप नगरसेवकाने पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फ्लेक्स लावून जाहीर आभार मानले आहेत. या फ्लेक्सची शहरात दिवसभर चर्चा सुरु आहे.

संबंधित ठेकेदार कंपनीने बोगस बॅक गॅंरटीच नाही, इंदापूरमधील गटारे व रस्त्यांची साफसफाई केल्याच्या कामाचे अनुभवाचे इंदापूर नगरपरिषदेचे खोटे प्रमाणपत्रही सादर केले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यात फसवणुकीसह बनावद दस्ताऐवज बनवल्याचे कलमही लावण्यात आले आहे. या बोगस कागदपत्राव्दांरे त्याने हे काम मिळवल्याचा गौप्यस्फोट पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी कागदपत्रांसहित २४ डिसेंबरच्या पालिका सभेत केला होता. तो करू नये म्हणून त्यांना धमकावण्यातही आले होते. या फसवणुकीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button