‘स्वबळाची तयारी आम्ही करत नाही’; चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : पुण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. याचा परिणाम महापायुतीवर होणार नाही. पुणे शहरासह इतर ठिकाणीही आणि सगळ्यांना इतर स्टेटमेंट करू नका, माईकवर भाषणे करू नका, मिठाचा खडा टाकू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वबळाची तयारी आम्ही करत नाही असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
महापालिकेच्या आगामी निणडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विभागीय बैठक पुण्यात पार पडली. त्यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
बावनकुळे म्हणाले की, आमच्याकडून असे कुणीही व्यक्ती मनभेद करणारे वक्तव्य करणार नाही. जेणेकरुन महायुतीवर परिणाम होईल. महायुती ही अवैध राहिली पाहिजे. आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत, म्हणून भाजप तशी भुमिका बजावत आहे, मनभेद होतील असे कोणी बोलू नये. असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे, त्यामुळे याला महत्त्व आहे. तीन हजार पदाधिकारी या बैठकीला आले होते. अध्यक्ष मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सोबत १३ जिल्ह्याचा संघटनात्मक बैठक घेण्यात आली. ५१ टक्के राज्यात मत घेऊन महायुती महाराष्ट्रात विजय होईल. असा दावा यावेळी बावनकुळे यांनी केला.
हेही वाचा – वेटलिफ्टिंग स्पर्धेत गायत्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे हा आमचा हेतू आहे. ३१ हजार कोटी पॅकेज सरकारने दिले आहे. आर्थिक मदतींपासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांना फरक कळत नाही, मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तींनी अशी बेजबाबदार वक्तव्य करावीत हे कळत नाही. पूर्ण ३१ हजार कोटींचे पॅकेज सरकारने दिले आहे. कुठल्या शेतकऱ्यांना मोबदला कसा दिला जाणार याची तपासणी केली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊन असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही पॅकेज जाहीर केले आहे.
असेही त्यांनी सांगितले. राज्यात फ्लॅट घर बंद पडत आहेत. इमारती उंच होत आहेत. रोज लाखो अर्ज येत आहेत. साडेतीन कोटी लोकांच्या मोजणी आता करायचे आहेत, आता डायरेक्ट खरेदीखत होत आहे. मोजण्या ३० दिवसाच्या आत झाल्या पाहिजेत, आज राज्य सरकारने अधिसूचना केले आहे की खाजगी भूमापक येणार आहेत त्यांच्या माध्यमातून काम सुरू होईल. पुरंदर विमानतळाला लागणारी ९० टक्के विमानतळ जमिनी अधिग्रहण झाल्या आहेत. बाकी राहिलेली जमीन लवकरच मिळेल, तिकडे आता खरेदीखत होणार नाही, आम्ही पैसे देणार आहोत, आमचे इमारती बनवणार नाही. प्लॉटिग होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी २५ वर्ष सभागृहामध्ये आहे. हतबल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते. दोन दिवस मंत्रालय दोन दिवसात विधिमंडळात आलेले बघितलं आहे. कोरोना काळात ते पुढे आले नाहीत, देवेंद्र फडणीस यांच्यावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही, आता राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचा २०१९ चा ३५ चा महाराष्ट्र आणि २०४७ चा महाराष्ट्र व्हिजन तयार केले आहे. असे बावनकुळे म्हणाले.




