Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

वेटलिफ्टिंग स्पर्धेत गायत्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

शिक्षण विश्व: दोन विद्यार्थ्यांनी पटकाविले "गोल्ड"

पिंपरी चिंचवड  :  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विभागस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विभागस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.

यामध्ये ऋतुराज संतोष आंब्रे व हर्षद वोराराम चौधरी या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावले, तसेच या दोघांची राज्य स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे. मोहित प्रकाशभाई संगाणी, साहिल पवन ठाकरे, आयुष आलोक सिंग व भक्ति सुधाकर ठोंबरे या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक प्राप्त केले.त्याचबरोबर कुशल गोविंदराम चौधरी व हर्षद दत्तात्रय शिंदे यांनी कांस्य पदक पटकावले.

हेही वाचा –  अमेरिकेचे भारताशी संबंधांना महत्त्व, नवनियुक्त राजदूत गोर यांचे प्रतिपादन, पंतप्रधानांशी भेट

संस्था अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील, सर्व मुख्याध्यापक, सर्व उपमुख्याध्यापक , सर्व पालक व शिक्षक यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक समाधान माने यांचे कौतुक केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button