भाज्या उकडुन की वाफवुन खावे?योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या
हिरव्या भाज्या आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न ,शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर प्रदान करतात.

पुणे : आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण अनेक प्रकारे शरीराची काळजी घेत असतो. तसेच आपल्या आहारात अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो. हिरव्या भाज्या आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न आपल्या शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर प्रदान करतात. याकरिता उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यक असतो. चांगला आहार म्हणजे पोषक तत्वांनी युक्त अन्न खाणे. पण तुम्हाला माहिती आहे का की भाज्या शिजवण्याची योग्य पद्धत कोणती आहे.? त्यातच त्यांच्या पौष्टिकतेवर ही परिणाम होतो? बऱ्याचदा अनेकजण याच संभ्रमात आहेत की भाज्या उकडुन की वाफवुन खावे.
आपल्यापैकी काही लोकांचा असा विश्वास आहे की भाज्या उकडुन त्या लवकर आणि चांगल्या प्रकारे शिजतात, तर काही लोक म्हणतात की भाज्या वाफवल्याने त्यामध्ये असलेले पोषक घटक सुरक्षित राहतात. शेवटी, कोणती पद्धत अधिक आरोग्यदायी आहे आणि कोणती तुमच्या आहारासाठी सर्वोत्तम ठरेल? आज या लेखात आम्ही तुम्हाला दोन्ही पद्धतींचे फायदे आणि नुकसान याबद्दल सांगणार आहोज जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार योग्य पद्धत निवडू शकाल.
भाज्या उकडुन खाण्याचे फायदे आणि नुकसान
फायदे
उकडलेल्या भाज्या लवकर आणि सहज शिजतात. तर काही उकडलेल्या भाज्यांच्या चवीत थोडासा बदल होतो, त्यामुळे काही भाज्या अधिक चविष्ट लागतात तसेच बटाटे, गाजर उकडल्याने ते मऊ होतात, ज्यामुळे यांचे सेवन केल्याने पचन देखील सहज होते.
नुकसान
भाज्या शिजवल्याने व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स सारखे पोषक घटक कमी होऊ शकतात. जर भाज्या जास्त वेळ उकडल्यास त्यांचा पोत आणि चव दोन्ही बिघडू शकते. ज्यामुळे यां भाज्याचे सेवनाने शरीराला कोणतेच पोषण मिळत नाही.
हेही वाचा : अतिरिक्त जलस्त्रोत : कालवा समितीत डावलले; जलसंपदा मंत्र्यांनी सावरले!
भाज्या वाफवुन खाण्याचे फायदे व नुकसान
फायदे:
तुम्ही जर भाज्यांना वाफवले तर त्यातील 90 % पोषक घटक टिकून राहतात. तसेच भाज्यांचा नैसर्गिक पोत आणि रंग अबाधित राहतो. यासोबतच भाज्यांमध्ये जास्त तेल आणि मसाले न वापरताही भाज्या खाण्यास हेल्दी आणि चविष्ट लागतात.
नुकसान
आपल्या आहारामध्ये अशा काही भाज्या असतात ज्या वाफवुन खाऊ शकत नाही.कारण ते शिजण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे अशा भाज्या व्यवस्थित न शिजल्यास त्यांचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला त्यांचा त्रास होऊ शकतो. तर काही लोकांना बिना मसाल्याशिवाय वाफवलेल्या भाज्या खाण्यास कमी चवदार लागतील.
कोणती पद्धत चांगली आहे?
जर तुम्हाला भाज्यांमधील पोषण टिकवून ठेवायचे असेल तर वाफवून घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याचवेळी, जर तुम्हाला अन्न लवकर शिजवायचे असेल तर ते उकडुन खाणे योग्य ठरेल. याशिवाय, चांगल्या आरोग्यासाठी भाज्या हलक्या वाफवल्यानंतर त्यांना हल्का तडका देऊन खाल्ल्याने तुम्हाला चव आणि पोषण दोन्ही मिळू शकते.