शहरात विविध ठिकाणे पार्किंगसाठी आरक्षित

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या (२६ सप्टें.) नियोजित पुणे दौऱ्याच्या कार्यक्रमास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक शहरात येण्याची शक्यता असल्याने पुणे शहरातील विविध ठिकाणच्या जागा वाहन पार्किंगसाठी अधिग्रहित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजना महिलांच्या मतांसाठी जुगाड’; भाजप आमदाराचं अजब विधान
त्यानुसार पुणे शहरातील नदीपात्र, भिडे पूल, पाटील प्लाझा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, डी. पी. रोड, म्हात्रे पुलाजवळ, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, हरजीवन हॉस्पिटल सावरकर चौक, पीएमपीएल मैदान पुरम चौक, निलायम टॉकीज, विमलाताई गरवारे शाळा, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कटारिया माध्यमिक शाळा, मिनर्व्हा पार्किंग मंडई व हमालवाडा पार्किंग या ठिकाणच्या जागा अधिग्रहित केल्या आहेत.





