कोल्हापूर ते पुणे दरम्यान वंदे भारत

पुणे : पुणे स्थानकावरून येत्या १५ सप्टेंबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. त्याआधी या मार्गावर चाचणी घेण्यात येणार असून, शनिवारी (दि. १४) कोल्हापूर ते पुणे दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेणार असल्याचे पुणे विभाग रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे- हुबळी- मिरज- पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. हुबळी आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी ही एक्स्प्रेस प्रवाशांना जलद प्रवासाचा आनंद देणार आहे. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ही पुण्यातून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सुटेल, तर मिरज येथे सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी आणि हुबळी येथे रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे.
हेही वाचा – To The Point : मोदी सरकारच्या धोरणांचा ‘महाराष्ट्र धर्म’ : राज्यात महत्वाच्या योजना, गुंतवणुकीतही वाढ!
या वंदे भारत एक्स्प्रेसला सर्व आठ वातानुकूलित कोच जोडण्यात आले आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस हुबळी येथून सकाळी ५ वाजता सुटणार असून, मिरज येथे सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. दुपारी दीड वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे.
दरम्यान, ट्रेनची चाचणी घेण्यासाठी शनिवारी (दि. १४) सकळी ११ वाजता वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन कोल्हापूर रेल्वे स्थानकातून सुटेल. ही ट्रेन हायस्पीड असल्यामुळे पुणे विभागातील प्रवाशांना कोल्हापूर आणि पुणे दरम्यान रेल्वे लाइन्स/ट्रॅकपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रवासी आणि नागरिकांनी अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.





