Weather Update : ऐन हिवाळ्यात राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा इशारा
![Unseasonal rain warning for some districts of the state, rain for next 2 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Weather-Update-1-780x470.jpg)
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही भागात थंडी तर काही भागात उन्हाचे चटके अद्यापही बसत आहेत. अशातच आता पुणे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा – धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान; म्हणाले..
7 Nov, latest satellite obs at 8 am indicate partly cloudy sky over Kerala, Tamilnadu, coastal andhra, Karnataka and parts of South Maharashtra.
Possibility of light to mod spells at isolated places during next 3,4 hrs.
Watch for IMD updates please. pic.twitter.com/eAT3Jq4jDz— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 7, 2023
उत्तर तमिळनाडूवर वाऱ्याची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आता दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टीलगत आहे. आठ नोव्हेंबर रोजी त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून मेघर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.