Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची संवेदनशीलता; थायलंडमधील अपघातग्रस्त दाम्पत्याला तत्परतेने मायदेशी आणण्यात मोलाचा वाटा

पुणे : थायलंडमधील फुकेत येथे सहलीसाठी गेलेल्या पुण्यातील एका दाम्पत्याचा झोका खेळताना अपघात झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या जोडप्याला भारतात परत आणून त्यांच्यावर यशस्वी उपचार सुरू करण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संवेदनशीलता दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली.

भोसरी येथील रहिवासी असलेले दोन दाम्पत्य नुकतेच पुण्याहून फुकेतला सहलीसाठी गेले होते. चौघेही कलीम बीचवरील अमरीतसर रेस्टॉरंटमध्ये थांबले होते. मात्र, सहलीच्या दुसऱ्याच दिवशी शुभम फुगे (वय २७) आणि त्यांची पत्नी सिद्धी (वय २१) हे झोका खेळत असताना अपघातग्रस्त झाले. झोका उंच गेल्याने दोघेही सटकून १० फूट खाली कोसळले. या अपघातात शुभम यांचे मांडीचे हाड आणि सिद्धी यांचे मणक्याचे हाड मोडले. त्यांना तातडीने फुकेतच्या पटाँग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण तिथे फक्त वेदनाशामक गोळ्यांवर ठेवले गेले. शस्त्रक्रियेसाठी त्यांना भारतात आणणे गरजेचे ठरले.

हेही वाचा –  बिश्नोई गँगच्या धमक्यांवर सलमान खान पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, ‘सगळं देव, अल्लाह यांच्यावर..’

या घटनेची माहिती मुरलीधर मोहोळ यांना एका कार्यकर्त्याकडून मिळताच त्यांनी तात्काळ पावले उचलली. मोहोळ म्हणाले, “हा प्रकार गंभीर होता. दोघांनाही विमानाच्या खुर्चीत बसणे शक्य नव्हते, त्यामुळे स्ट्रेचरची व्यवस्था करावी लागली. यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, हवाई वाहतूक कंपन्यांच्या परवानग्या आणि विमानात जागा उपलब्ध करणे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. स्ट्रेचरसाठी काही खुर्च्या काढाव्या लागल्या, त्याचीही पूर्तता करावी लागली.”

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि त्यांच्या कार्यालयातील यंत्रणेच्या समन्वयाने शुभम आणि सिद्धी यांच्यासह दुसरे दाम्पत्य अभिजीत पठारे आणि काजल मोरे यांना इंडिगो एयरलाइनच्या दोन वेगळ्या विमानांद्वारे भारतात आणण्यात यश मिळाले. पुण्यात पोहोचताच जखमींना संचेती रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रियेस सुरुवात झाली.

मोहोळ पुढे म्हणाले, “परदेशात अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. अशा प्रसंगी सर्व सरकारी यंत्रणा संवेदनशीलतेने काम करते आणि त्याचा फायदा गरजूंना होतो.” या घटनेने मोहोळ यांच्या तत्परतेचे आणि मानवतेचे दर्शन घडवले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button