Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

खासदार राघव चड्ढांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; म्हणाले, “ही सकाळ…”

Raghav Chadha Meets PM Narendra Modi : आम आदमी पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेतील नव्या भूमिकेत असलेले राघव चड्ढा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधानांनी दिलेल्या वेळेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. विशेष म्हणजे विरोधात असताना राघव चड्ढा यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मात्र भाजपामध्ये आल्यानंतर आपण आता सत्ताधारी बाकाची बाजू मांडणार असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यसभेत बोलताना सांगितले.

“ही सकाळ माझ्यासाठी सदैव अविस्मरणीय राहील. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेण्याचे भाग्य मला लाभले. त्यांनी आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तसेच त्यांच्या विचारांचा व मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे,” असे चड्ढा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले.

राघव चड्ढा यांनी यावर्षी एप्रिलमध्ये आम आदमी पक्ष सोडल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभेतील आपच्या सात खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. यामध्ये अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांचाही समावेश होता. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर चड्ढा यांच्या राज्यसभेतील भूमिकेतही बदल झाला आहे. राज्यसभा समित्यांच्या पुनर्रचनेनंतर २० मेपासून त्यांची कमिटी ऑन पेटिशन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा –  दहशतवादी संघटनांशी संबंधित ११४ साहित्य सामग्रीवर महाराष्ट्र सरकारने घातली बंदी, कोणत्या संघटनांचा समावेश?

दरम्यान, नीट पेपर लीक प्रकरणावरून चड्ढा यांच्या भूमिकेवरही अलीकडे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यावर ते आधी उघडपणे का बोलले नाहीत, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. विरोधी पक्षात असताना प्रश्न उपस्थित करणे आणि सरकारला जाब विचारणे ही आपली जबाबदारी होती, मात्र आता समस्या मांडण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्यावर आपला भर आहे, असे त्यांनी राज्यसभेत स्पष्ट केले.

“जे हितचिंतक मला काही काळापासून विचारत होते की, ‘राघव, तुम्ही नीटच्या मुद्द्यावर कधी बोलणार? आम्हाला तुमचे म्हणणे ऐकायचे आहे,’ त्यांनाही मला काही सांगायचे आहे. मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की, जेव्हा मी विरोधी पक्षात होतो तेव्हा प्रश्न हे माझे शस्त्र होते; पण आज मी सत्ताधारी बाकांवर बसलो आहे, त्यामुळे उपाय शोधणे ही माझी जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.

चड्ढा यांनी पुढे सांगितले की, या मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी ते दररोज कॅमेऱ्यासमोर येऊ शकले असते; परंतु बातम्यांची हेडलाईन्स मिळवणे हे त्यांचे प्राधान्य नसून योग्य तोडगा काढणे याला मी प्राधान्य देत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button