#SalmanKhan | बिश्नोई गँगच्या धमक्यांवर सलमान खान पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, ‘सगळं देव, अल्लाह यांच्यावर..’

Sikandar | बॉलीवूड अभिनेता सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने बऱ्याच वेळा ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्याच्या घराबाहेर गोळीबारसुद्धा झाला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. आता सलमानने ‘सिकंदर’च्या एका इव्हेंटमध्ये त्याला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल मौन सोडलं आहे. सध्या सलमान खान सध्या ‘सिकंदर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
तुला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, तर भीती वाटत नाही का? असं सलमान खानला विचारण्यात आलं. यावर सलमान खान म्हणाला, की सगळं देव, अल्लाह यांच्यावर आहे. जेवढं आयुष्य जगणं नशिबात असेल तेवढं असेल. एवढंच. काही काही वेळा इतक्या लोकांना सोबत घेऊन चालावं लागतं, तीच एक अडचण आहे.
हेही वाचा : Sahkar Taxi | Ola आणि Uber ला टक्कर देणार ‘सहकार टॅक्सी’; अमित शहांची माहिती
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याच्या आरोप झाला होता. सलमान खानने या गोष्टीला नकार दिला होता. या प्रकरणी सलमानला २००६ मध्ये एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर जोधपूर कोर्टाने त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये सलमानला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला होता. दुसरीकडे राजस्थान हायकोर्टाने त्याची २०१६ मध्येच निर्दोष मुक्तता केली होती.