TOP Newsताज्या घडामोडीपुणे

गुरुवारचे परिपत्रक शुक्रवारी रद्द

राज्यातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या वेळापत्रकात एका दिवसातच बदल करण्याची नामुष्की ग्रामविकास विभागावर ओढवली. गुरुवारी (२० ऑक्टोबर) प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार ऐन दिवाळीत शिक्षक बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. मात्र गुरुवारचे परिपत्रक शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) रद्द करून ३१ ऑक्टोबरपासून शिक्षक बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून गुरुवारी परिपत्रकाद्वारे बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया ऐन दिवाळी सुरू होत असल्याने या वेळापत्रकाबाबत राज्यभरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे गुरुवारचे परिपत्रक रद्द करून नव्या वेळापत्रकाचे नवे परिपत्रक शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले.  

दिवाळीचा सण आणि क्षेत्रीय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करायच्या कामांचे स्वरुप लक्षात घेता त्यासाठी अधिकचा वेळ लागणार असल्याचे नमूद करून २० ऑक्टोबरचे परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच बदली प्रक्रियेसाठीचे सुधारित वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार ३१ ऑक्टोबर ते ५ जानेवारी या कालावधीत बदली प्रक्रियेचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत.
दिरंगाई झाल्यास कारवाई

जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने सर्व कामे दिलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण करायची आहेत. या कामी दिरंगाई झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button