Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मंकी हिल ते पळसदरी दरम्यान लोहमार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली
![The railway between Monkey Hill and Palsadari collapsed in several places](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/IMG-20210722-WA0011-e1626939069509.jpg)
पुणे – मुंबई-पुणे लोहमार्गावर बोरघाटात मंकी हिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
लोणावळा आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बोरघाटात मुंबई-पुणे लोहमार्गावर ठिकठिकाणी दरड कोसळली आहे. तसेच काही ठिकाणी रेल्वे मार्गावरील ट्रॅकच्या खालील माती वाहून गेली आहे. यामुळे मुंबई पुणे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर राडारोडा साचला असल्याने तो बाजूला करेपर्यंत रेल्वे वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या लोहमार्गावरील विजेचे खांब काही ठिकाणी वाकले आहेत. तर तारा तुटण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. या खांबांचे देखील दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.