ताज्या घडामोडीपुणे

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची रंजक कथा आणि तथ्य

येत्या 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे.

पुणे : येत्या 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. स्वामींचे भक्त मोठ्या भक्तिभावाने या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात. स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील प्रकट दिनानिमित्त महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत असते. पण प्रत्येक भक्ताच्या मनात प्रेम आणि आदराचं स्थान मिळवणारे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले? कुठून आले? याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. आपण ज्यांची मनोभावे भक्ती करतो ते आपले स्वामी कसे प्रकट झाले याबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते. आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची रंजक कथा आणि तथ्य सांगणार आहे.

दत्तात्रेयांचा तिसरा अवतार म्हणून प्रकटले श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही. पण याबद्दल एक कथा सांगितली जाते, त्यानुसार, असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४ किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात 1856 मध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. त्यानुसार या वर्षी 31 मार्चला सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की, अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे-तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. याठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथून ते सोलापूरमार्गे अक्कलकोटला आले.

हेही वाचा –  ‘लाडकी बहिण’ योजनेवर नीलम गोऱ्हे यांच मोठं विधान; विधिमंडळातील कामकाजावर केले भाष्य

खंडोबा मंदिरात घेतला आश्रय!
श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते खंडोबा मंदिरात स्थानपन्न झाले. या ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले. विशेष म्हणजे त्यांनी कोणातही कधीच फरक केला नाही. आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की, ते यजुर्वेदी ब्राह्मण आहे, त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि राशी चिन्ह मीन आहे. त्यांनी आपले शिष्य श्री बालप्पा आणि श्री चोलप्पा यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले.

वयाच्या ६०० व्या वर्षी महासमाधी घेतली
अशी कथा आहे की श्री स्वामी समर्थांनी विविध ठिकाणी ४०० वर्षे तपश्चर्या केली. सन 1458 मध्ये नरसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेनिमित्त कर्दळीच्या जंगलात ते गायब झाले. अशी एक प्रचलित कथा आहे की, या जंगलात स्वामी ३०० वर्षे समाधी अवस्थेत होते. दरम्यान, मुंग्यांनी त्याच्या शरीराभोवती एक कुंड तयार केले. एके दिवशी लाकूडतोड्याने या ठिकाणी असलेल्या झाडावर जोरात वार केला, तेव्हा त्याला रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी ध्यानात मग्न दिसला. लाकूडतोड्या त्याच्यासमोर नतमस्तक झाला आणि क्षमा मागू लागला. त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्याला, ही तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचं म्हंटलं. त्यानंतर नवीन स्वरूपात, ते 1856 ते 30 एप्रिल 1878 पर्यंत अक्कलकोट येथे राहिले. त्यांनी आयुष्याची शेवटची बावीस वर्षे तिथे घालवली. त्यांची शेवटची वर्षे एका वटवृक्षाखाली घालवली. जिथे त्यांनी वयाच्या 600 व्या वर्षी महासमाधी घेतली. असे म्हटले जाते की, जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला. एक भाग वटवृक्षात विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो आणि दुसरा भाग साईबाबांमध्ये विलीन झाला.

हव्या त्या स्वरुपात भक्तांना भेटले..
श्री स्वामी समर्थ हे पूर्णब्रह्माच्या रूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिलं आहे. ज्या रूपात ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असत. काही भक्तांनी त्यांना श्री विठू माऊली, काहींनी श्री भगवान विष्णू तर काहींना भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले. प्रत्येक अडचणीत, संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात, असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले गेले आहेत. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..’ हे स्वामी समर्थांचं वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देतं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button