साप दिसल्यावर त्याला पळवण्यासाठी किचनमधील काही वस्तू कामात येतात.
घरात साप आल्यास तेथे फिनाईल, व्हिनेगर किंवा रॉकेलचे तेल शिंपडावे.

पुणे : साप कोणाचे नुकसान करत नाही. परंतु जेव्हा त्याला धोका वाटतो, तेव्हा तो दंश करतो. स्वत:ला वाचवण्यासाठी हल्ला करतो. त्यामुळे घरात किंवा परिसरात साप दिसल्यावर त्याला पळवण्यासाठी किचनमधील काही वस्तू कामात येतात.
प्राणीशास्त्रचे तज्ज्ञ डॉ.अनिल कुमार म्हणतात की, भारतात केवळ 20 टक्के विषारी साप आढळतात. साप कधीच माणसांना चावण्याच्या मनस्थितीत नसतो.तो जीव वाचवण्यासाठी हल्ला करतो. त्याला आपल्यापासून धोका आहे, असे वाटल्यावर तो हल्ला करत असतो.
घरात साप घुसल्यास त्याला एकटे सोडून द्या. तो कुठे लपला आहे, हे तुम्हाला समजल्यावर सर्प मित्राला बोलवून त्याची मदत घ्या. दुसरा प्रकार किचनमधील काही गोष्टींचा वापर करुन करता येईल.
हेही वाव्हा – उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे पिंपरी महापालिकेचे नागरिकांना आवाहन
उग्र वासामुळे सापही अस्वस्थ होतात. त्यामुळे घरात साप आल्यास तेथे फिनाईल, व्हिनेगर किंवा रॉकेलचे तेल शिंपडावे. यासोबत लसूण, लिंबू, दालचिनी आणि पुदिना शिंपडा याच्या वासाने साप पळून जातो. त्याचप्रमाणे तापमानात होणाऱ्या बदलांची भीतीही सापांना असते. धूर केल्यावर साप त्या ठिकाणी थांबत नाही.
सापाला कान नसतात, पण मोठ्या आवाजाला साप खूप घाबरतात. त्यांच्या शारीरिक रचनेमुळे तो आवाजाची दिशा ओळखततो. एका संशोधनानुसार, शरीराची ही रचना त्यांना शिकारीपासून बचाव करण्यासाठी मदत करते. त्यामुळे जवळपास मोठा आवाज झाल्यावर साप त्या ठिकाणावरुन पळून जातो.