Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातून रोज सहा टँकर पाणीचोरी; राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेल्या पदाधिका-याविरोधात गुन्हा दाखल

पुणे |महाईन्यूज|

सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आरोपी भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी मंगलदास बांदल हा राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेला माजी प्रदेश उपाध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे.

आरोपी मंगलदास बांदल आणि त्याच्या भावाविरोधात सेवानिवृत्त पोलीस ज्ञानदेव तनपुरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. बांदल भावंडं तनपुरेंच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगलदास बांदल आणि त्याचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानदेव तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्याचा भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरुन नेत होते. तसेच तनपुरेंच्या मालकीची जमीन बळकावण्याचाही बांदल भावांचा प्रयत्न होता, असा तनपुरे यांचा आरोप आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button