Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘सिद्धार्थ शिरोळेंच्या विजयासाठी सर्वसमावेशक रणनीती’;  प्रचारप्रमुख दत्ता खाडे

पुणे : “सिद्धार्थ शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. यंदाही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. शिरोळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रचाराची सर्वसमावेशक रणनीती आखण्यात आली आहे. आगामी पंधरा दिवस मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचे भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख दत्ता खाडे यांनी सांगितले.

शिरोळे घराण्याचा लोकसेवेचा वारसा, सामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि तरुण, आश्वासक चेहरा ही वैशिष्ट्ये असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षांत परिसरातील नागरिकांशी नाळ जोडली आहे. शिवाजीनगर मतदारसंघात मेट्रोपासून झोपडपट्टी भागातील पायाभूत सुविधांपर्यंत, तसेच मतदारसंघाला डिजिटल बनवण्यापासून केंद्राच्या शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक प्रकारच्या विकासकामांना गती दिली आहे. त्याद्वारे त्यांनी कार्यक्षम आमदार ही प्रतिमा जनमानसांत ठसवली आहे. त्यामुळे आजघडीला मतदार त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत, असे चित्र निवडणूकपूर्व आढाव्यातून स्पष्ट झाल्याचेही खाडे यांनी सांगितले.

हेही वाचा –  मावळात संपूर्ण भाजपा सुनील शेळकेंसोबत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोखलेनगर हा गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय वस्तीचा भाग, सेनापती बापट रोडवरील उच्चभ्रू लोकवस्ती, शिवाजीनगर गावठाण आणि परिसरातील पारंपरिक कुटुंब या सगळ्यांच्या गरजा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांनी या सगळ्या लोकांशी दांडगा संपर्क राखून, लोकसहभागाला प्राधान्य देत त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आणि समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यातून आश्वासक आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. केवळ भाजपच नव्हे, तर सर्व पक्षांचे नेते-कार्यकर्ते आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सिद्धार्थ यांच्याकडे बघतात, हे त्यांच्या कार्यशैलीचे यश आहे, असेही खाडे म्हणाले.

“मतदारसंघात सर्व स्तरांतील मतदारांशी भाजप आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा उत्तम संपर्क आहे. तो वृद्धिंगत व्हावा आणि शिरोळे यांना विक्रमी मताधिक्य मिळावे, यासाठी सर्वसमावेशक रणनीती आखली आहे. पक्षाच्या अभियानातून विकासकामांची माहिती घराघरांत पोहोचवणार आहोत. त्याचे प्रतिबिंब विक्रमी मताधिक्यात दिसून येईल, याची खात्री आहे.”

– दत्ता खाडे, प्रचारप्रमुख – शिवाजीनगर मतदारसंघ, भाजपा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button