breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण
मावळात संपूर्ण भाजपा सुनील शेळकेंसोबत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महायुतीच्या प्रचारासाठी स्वत: मैदानात : उपमुख्यमंत्र्यांचा नाना काटे यांना ‘‘शब्द’’
मावळ, पुणे : मावळमध्ये भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला विरोध करीत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्यांसोबत भाजपा नाही. संपूर्ण भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्या पाठिशी उभी करणार आहोत. मी स्वत: मावळात पूर्ण ताकदीने उतरणार आहे, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि फडणवीस यांचे मोबाईलवर संभाषण झाले. त्यामध्ये फडणवीस यांनी सुनील शेळकेंसाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, काही लोकांनी वैयक्तिक दुश्मनीतून पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदार संघात महायुतीची उमेदवारी भाजपाचे शंकर जगताप यांना मिळाली. त्यावेळी नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली. त्यामुळे ‘‘जो न्याय चिंचवडमध्ये ताेच न्याय मावळात असला पाहिजे. मावळातही महायुतीच्या धर्माचे पालन व्हावे..’’ अशी मागणी नाना काटे यांनी केली. यावर ‘‘तुम्ही निश्चिंत रहा… आम्ही सुनील आण्णांचे पूर्ण ताकदीने काम करणार आहोत, ’’ असा विश्वास फडणवीस यांनी दिला आहे.
टीप : सदर ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.