सेवाधाम ट्रस्ट व्याख्यानमालेत इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आणि आमदार सुनील शेळके यांचा नागरी सत्कार
इन्दुरीकरांनी कीर्तनातून जीवनातील तात्त्विक गोष्टी साध्या आणि सोप्या भाषेत समजावल्या

तळेगाव दाभाडे: सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने आयोजित जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमाला-२०२५ च्या २३ व्या पर्वाचा समारंभ ७ फेब्रुवारी रोजी थाटात पार पडला. या सोहळ्यात ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाने श्रोत्यांची मने जिंकली.
प्रांगणातील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून जीवनातील तात्त्विक गोष्टी साध्या आणि सोप्या भाषेत समजावल्या. “ज्ञान, साधना आणि साधू संतांच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन यथार्थ समजत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, “संपत्ती आणि दया कधीच एकत्र येत नाहीत. जर ती मिळाली, तर तो माणूस देवाच्या मार्गावर आहे.” तसेच, मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात न अडकता अभ्यास करून आपल्या जीवनाचे ध्येय साधावे, अशी सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मावळचे लोकप्रिय आमदार सुनील (आण्णा) शेळके यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सलग दुसऱ्यांदा मावळ विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार शेळके यांनी यावेळी नागरिकांच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, मावळच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या प्रयत्नांना आणखी चालना देण्याचे वचन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेशआप्पा ढोरे (मा. सभापती, पंचायत समिती मावळ) होते, तर प्रायोजक म्हणून दुबईतील उद्योजक विनोद रामचंद्र जाधव (चेअरमन- सावा हेल्थकेअर लि.) यांचे विशेष योगदान लाभले.
हेही वाचा : ‘अजिंक्य डी वाय पाटील’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच केली ग्राम स्वच्छता!
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व सचिव डॉ. वर्षा वाढोकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि भविष्यातही सेवाधाम ग्रंथालयाच्या उपक्रमांसाठी असेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी सहसचिव अतुल पवार, खजिनदार कैलास काळे, सदस्य डॉ. मिलिंद निकम, राजेश बारणे, अमित बांदल, ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे, तेजस धोत्रे, विश्वास देशपांडे, तानाजी मराठे, संजय चव्हाण, संजय वाडेकर आदींनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन डॉ. मिलिंद निकम आणि प्रा. अशोक जाधव यांनी, तर आभार राजेश बारणे यांनी मानले.
कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उद्योजक विलास काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.