रवींद्र धंगेकर उद्या सोमवारी दाखल करणार आपला उमेदवारी अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Pimpri-Chinchwad-13-780x470.jpg)
पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर हे उद्या सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, कसबा विधानसभा मतदारसंघातील ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेऊन मिरवणुकीने ,शक्ती प्रदर्शन करत, श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रवींद्र धंगेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा – मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी, ९ जण जखमी
यावेळी महाविकास आघाडीचे शहरातील सर्व पदाधिकारी नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रवींद्र धंगेकर यांनी केले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा सामना महायुतीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याशी होणार आहे. मागील पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा सामना हेमंत रासने यांच्याशी झाला होता.या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी एक हाती विजय मिळविला होता. आता परत भाजप वतीने हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांनी याआधीच आपल्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.