Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनसे-शिवसेना एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले..

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं किंवा हे बंधू भविष्यात एकत्र येतील अशी चर्चा सातत्याने होत असते. आता मनसेचे माहीम येथील उमेदवार आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तेसच, त्यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

अमित ठाकरे म्हणाले, की मी तेव्हा आजारी होतो. मी वडिलांकडे पाहत होतो, मला माहीत होतं की माझे वडील काय आहेत. या गोष्टींचा त्यांना फरक पडणार नाही हे मला माहीत होतं. ते पुढे काय करणार हेही मला माहीत होतं. पण त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) नैतिकता पाळली नाही. पण आता हे सांगतात की आजारी असताना ४० आमदार फोडले. मी आजारी असताना नगरसेवक फोडले, मग तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का? आपण चुकीचं करतोय.

हेही वाचा     –    मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी, ९ जण जखमी 

वडील म्हणून मला संपूर्ण आत्मविश्वास आहे की ते काय करू शकतात. सात नगरसेवक गेले तर ते शंभर उभे करू शकतात. त्यांना वाईट वाटलं असणार पण आत्मविश्वास त्यांचा ढळला नसेल. तेव्हाच दोन भाऊ एकत्र यावेत, हा विचार माझ्यासाठी संपला. त्यामुळे मनसे-शिवसेने एकत्र येण्याची शक्यता आता माझ्याकडून तरी नाही, असंही अमित ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button