Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी, ९ जण जखमी

मुंबई | मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच यातील दोण जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, वांद्रे ते गोरखपूर ही या गाडीला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे रेल्वे आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वेत चढण्यासाठी मोठी गर्दी केली आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरी दरम्यान काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले आणि त्यामध्ये ते जखमी झाले. यानंतर त्यांना रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र, यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

हेही वाचा    –      चिंचवड विधानसभा मतदार संघात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना गर्दी न करण्याचं आणि रेल्वेत चढत असताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म परिस्थिती व्यवस्थित असून प्लॅटफॉर्मवर पोलीस उपस्थित असल्याची माहिती देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button