या राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरू, शनिचं राशी परिवर्तन
शनि देवाच्या चालीचा काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होतो.

पुणे : शनिला न्यायाची देवता असं म्हटलं जातं. शनि देव जर प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहात नाही असं मानलं जातं. शनिची चाल ही खूप धिमी असते. शनि देव जेव्हा जेव्हा आपल्या चालीमध्ये परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव हा बाराही राशींवर होतो. शनि देवाच्या चालीचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होतो तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचं महत्त्व आणि स्थान वेगवेगळं असतं. शनिला सर्वात शक्तिशाली ग्रह मानलं जातं. शनि देवाने आपली चाल बदलल्यानंतर ज्या राशींवर त्यांची शुभ दृष्टी पडते, त्या राशींच्या लोकांचं आयुष्यच बदलून जातं. शनि देव एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. शनि देव प्रत्येक राशीमध्ये अडीच वर्ष मुक्काम करतात. सध्या शनि देव हे कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत. मात्र होळीनंतर शनिचं आपल्याच राशीमध्ये परिवर्तन होणार आहे. शनि कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये जाणार आहेत. शनि जेव्हा जेव्हा राशी परिवर्तन करतो. तेव्हा तेव्हा ते सोने, चांदी, लोह आणि तांबा यापैकी एका पायावर दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात. 29 मार्चला शनि देव हे चांदीच्या पायाने मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते. जाणून घेऊयात शनिच्या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे .
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील लघु उद्योजकांना लोकप्रतिनिधी- प्रशासनाचा ‘विश्वास’
कर्क रास – शनि देवाच्या राशी परिवर्तनाचा कर्क राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. प्रत्येक कार्य कोणतीही अडचण न येता पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती देखील मजबूत होणार आहे. तुमचं इनकम देखील वाढणार असून, उत्पन्नाचे नवे स्त्रोत देखील मिळू शकतात.
तुळ रास – शनि देवाच्या राशी परिवर्तनाच तुळ राशीला देखील मोठा फायदा होणार आहे. तुम्ही जर व्यापारात आधीच गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यापासून मोठा लाभ होण्याचा योग आहे. तसेच नोकरीत देखील प्रमोशन मिळू शकतं.
वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे, आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी या काळात दूर होऊन नवे मार्ग सापडणार आहेत.