अभिमानस्पद!..रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
![Proud! .. Scholarship to students in Italy in the name of Ranjit Singh Disley](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/dislay_1607093366.jpg)
पुणे |महाईन्यूज|
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यापीठस्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. “कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप’ या नावाने 400 युरोची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे प्रांतातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत.
या प्रस्तावांची बेनव्हेंटोचे महापौर आणि कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी छाननी करणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्व बाजूंचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर या मुलांची निवड करणार असून, पुढील दहा वर्षे 100 मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कार रकमेतील म्हणजेच सात कोटींपैकी अर्धी रक्कम म्हणजेच साडेतीन कोटी 9 देशांतील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकीच एक आहेत.