रुपाली चाकणकरांच्या विरोधात संताप..
आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य
पुणे : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीचे आंदोलन सुरू आहे. रुपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी शिवेसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीची मागणी आहे. हीच मागणी घेऊन महिला आघाडी आज रस्त्यावर उतरली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या – आंदोलक
ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या आंदोलकांनी यावेळी बोलताना, ‘असं काय आहे रुपाली चाकणकरांकडे की तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाही? तुम्ही स्वत: बोलला की त्यांचं वक्तव्य चुकीचं मग का राजीनामा घेत नाही? पोलिसांना पुढे आणून आमच्यावर दबाव आणत आहेत. अजित दादा तुम्हाला चॅलेंज करतो की तुमच्यावर कोणता दबाव आहे का? तुम्ही का राजीनामा घेत नाही? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा : पिंपळे सौदागरमध्ये रंगणार आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप स्पर्धा
रुपाली चाकणकर यांनी महिला डॉक्टरचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला
रुपाली पाटील यांनी म्हटले की, ‘रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा ही माझी नाही तर राज्याची मागणी आहे. रुपाली चाकणकर यांनी संपदा मुंडे हीच चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझी तर वैयक्तिक मागणी आहे की रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा आणि एक संवेदनशील बाई ही त्या पदावर बसवावी. आमचे पालकमंत्री अजित दादा आहेत त्यांनी कुटुंबाची संवाद साधला आणि सांगितलं की राज्य महिला आयोगाच मत म्हणजे माझं मत नाही.
चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांकडूनही आंदोलन
रुपाली चाकणकरांविरोधातील या आंदोलनावेळी चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांकडूनही ठाकरे गटाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी दोन्ही गटाचे आंदोलन आमनेसामने आले होते. यावेळी बोलताना चाकणकर समर्थकांनी म्हटले की, ‘ही खरंतर कामाची पावतीच आहे. ठाकरे गट आंदोलन यासाठी करत आहे, कारण त्यांना फेमस व्हायचं असेल. न्यायदेवता आहे ना न्याय करायला.’




