पुणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू

पुणे : प्रवाशांकडून सातत्याने मागणी होत असल्याने पुणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रीपेड ऑटो रिक्षा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकातील परिसरात मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला प्रीपेड ऑटो रिक्षा केंद्र स्थापन केले आहे. आतापर्यंत एक हजार २४९ रिक्षाचालकांंनी नोंदणी केली असून, १८ हजारांहून अधिक प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे, तर ३१ लाखांपेक्षा जास्त व्यवहार या सुविधेमार्फत झाले आहेत.
हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ अपघातात बिबट्याचा मृत्यू
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले म्हणाले, की पुणे स्टेशनवरील प्रवासी सेवा संघाचा करार संपुष्टात आला. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद सुविधा बंद होती. मात्र, आता ती सुरू केली असल्याने तक्रारी, वादविवादांना पूर्णत: आळा घालता येणे शक्य झाले आहे.





