Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पेट्रोलपंप पुण्यात सातनंतर सुरु राहणार का?

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वाढले

पुणे : पुण्यामध्ये पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने रात्री सात वाजल्यानंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. या भूमिकेमुळे पुणेकरांना चांगली धास्ती बसली होती. मात्र बुधवारी रात्री यावर तोडगा निघालाय.

पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना एक पत्र लिहून याबाबत पोलिसांनी लवकरात लवकर संयुक्तिक बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याने आता पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सातनंतरही सुरु राहतील. पुणेकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

हेही वाचा     :          पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन पथकाचे कौशल्यपूर्ण रेस्क्यू! 

कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वाढले
पुण्यात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागच्या सात दिवसांत कर्मचाऱ्यावर तीन हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील पेट्रोल पंपचालक आणि विक्रेता संघटना संतप्त झाल्या आहेत. या घटना थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button