Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आता शहराच्या सौंदर्यात पडणार भर

पुणे : प्रत्येक शहराची स्वत:ची विशिष्ट संस्कृती असून, त्यास महत्त्व आहे. शहरांचे सौंदर्यीकरण अबाधित राहावे, तसेच व्यवसाय आणि पर्यटन या दोन्हीला चालना देण्यासाठी महापालिकांमध्ये अर्बन डिझाइन सेलची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सेलच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरणाचा आराखडा करण्यात येणार आहे. शहराची वास्तुशैली यांचा विचार करून विकास करण्यात येणार आहे, तसेच हेरिटेज स्थळे, नदीसुधार प्रकल्प, मंदिरे आदी परिसरांचे सौंदर्यीकरणासाठी ही समिती उपाययोजना सुचविणार असून, त्याच्या अंमलबजावणीवरही लक्ष ठेवणार आहे.

शहराचा विकास आराखडा तयार करण्यामागे प्रमुख उद्देश हा रहिवास, औद्योगिक, वाणिज्य, कृषी आदी प्रयोजनासाठी जमिनींच्या वापराचे नियोजन करणे, नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, शहरातील सृष्टी- सौंदर्याची ठिकाणे दर्शनीय भूभाग, ऐतिहासिक, नैसर्गिक, वास्तुशास्रीय, वैज्ञानिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या जागांचे जतन करण्यासाठी नियोजन करणे हा उद्देश असतो. मात्र, अलिकडच्या काळात वाढते नागरीकरण, वाहतूक, इमारतींची उभारणी होत आहे. त्यामध्ये शहराचे सौंदर्य, वास्तुशैली यांचा मात्र विसर पडताना दिसत आहे. शहराची ओळख कायम राहावी, यासाठी शासनाने आता पावले उचलल्याचे दिसत आहे. त्यासाठी अर्बन डिझाइन सेलची स्थापना केली आहे.

हेही वाचा –  भीमाशंकर विकास आराखडा तयार करावा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना

शहरातील रस्त्यांचे, चौकांचे तसेच रस्त्यालगत दोन्ही बाजूस सुयोग्य रंगसंगती, सौंदर्यीकरणाच्या व वाहतूक दळणवळणाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून नियोजन करावे आणि योग्य ते सुशोभीकरणाचे डिझाईन तयार करावे, अशा सूचनाही नगर विकास विभागाने दिल्या आहेत. याबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे सहसचिव डॉ. प्रतिभा भदाणे यांनी जारी केले आहेत.

पुणे शहरात महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाणार आहे. यासमितीमध्ये नगर रचना विभागाचे उपसंचालक, शहर अभियंता, हेरिटेज क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती, शहर नियोजन संबधित विषयांमधील अनुभवी वास्तुविशारद, स्ट्रक्चरल इंजिनिअर शहराचे सौंदर्यीकरण या विषयामध्ये अनुभव असलेले शहरातील ज्येष्ठ नागरीक हे या समितीचे सदस्य असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button