एक एप्रिल नव्हे; नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्येच

पुणे : आगामी शैक्षणिक वर्ष दि.१ एप्रिलपासून सुरू करण्याबाबत शाळा, पालक, संस्थाचालक व त्यांच्या संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तांत्रिकबाबींमुळे शैक्षणिक वर्ष हे दि. १ एप्रिलला सुरू करणे सहजासहजी शक्य नाही. याशिवाय नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्येच सुरू होणार असल्याचे शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शालेयस्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे शैक्षणिक वेळापत्रकही राज्य मंडळाच्या शाळांना लागू करण्याचे नमूद करण्यात आले.
त्यातच आगामी शैक्षणिक वर्ष दि. १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असून याबाबत अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम सुरू केले आहे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले होते. त्यामुळे राज्यभरातील शाळा, पालक, संस्थाचालक, शिक्षक अशा सर्वच घटकांमध्ये पुरेसे स्पष्टीकरण न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला होता.
हेही वाचा – ई-रजिस्ट्रेशनद्वारे घरबसल्या दस्त नोंदणी
– शिक्षण विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध नाही.
– सीबीएसईनुसार पाठ्यपुस्तके छपाई करावी लागणार.
– प्रचलित वेळापत्रक बदलून शाळा सुरू करण्यास विरोध.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत प्रचलित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नाही. शाळा जूनपासूनच सुरू होतील. शाळा सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल करायचा झाल्यास त्याबाबत सविस्तर चर्चा करावी लागणार आहे. त्यासाठी योग्य वेळ देणेही आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही.”
– सचिंद्र प्रताप सिंग, शिक्षण आयुक्त