Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बॅग तपासणीसाठी नवी यंत्रणा, पुणे विमानतळावर होणार वेळेची बचत

पुणे :  विमातळावर प्रवाशांचा बॅग तपासणीतच बराचवेळ जात होता. मात्र, पुणे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक दोन मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

विमान प्रवासात सुरक्षित तपासणी होणे आवश्यकच आहे. मात्र, या तपासणीसाठी लागणार वेळ, त्यामुळे होणारी गर्दीला प्रवाशी वैतागले आहेत. सर्व तपासण्यांसाठी तासंतास रांगेत थांबावे लागते. एवढेच नव्हे तर त्यांना एक ते दोन तास अधी विमानतळावर पोहोचावे लागते. मात्र, आता प्रवाशांचे पुणे विमानतळावरील चेक इनसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांच्या बॅगांच्या तपासणीसाठी दोन अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या मशिन बसवल्या आहेत.

हेही वाचा – महायुतीत मंत्रिपदाचं समीकरण काय? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

या मशिन एका तासात सुमारे अकराशे ते बाराशे बॅगांची तपासणी करू शकतात. त्यामुळे प्रवाशांचे बॅगा तपासणीसाठी होणारे वेटिंग कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button