ताज्या घडामोडीपुणे

नेल कटरमध्ये असलेल्या दोन ब्लेडचा उपयोग माहीत आहे का?

नखे कापण्यासाठी नेल कटरचा वापर प्रत्येकजण करतो. परंतु त्या नेल कटरमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व सर्वांना माहीत नसते.

पुणे : शरीराची स्वच्छता गरजेची आहे. यामुळे शरारातील सर्व अवयवांची आपण नियमित स्वच्छता करत असतो. त्यात नाक, तोंड याचाही समावेश आहे. परंतु नखे स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. नखांमधून कीटक सरळ तोंडातून पोटात जावू शकतात. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

नेल कटरचा वापर फक्त नखे कापण्यासाठी नाही. त्याचे अनेक उपयोग आहे. नेल कटरमध्ये असलेल्या दोन ब्लेडचा उपयोग माहीत आहे का? अनेक लोकांना नेल कटरमध्ये असणारे चाकू सारखे हे दोन ब्लेड का दिले आहे, त्याबाबत काहीच माहीत नाही.

हेही वाचा –  असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात ऐतिहासिक वेतन करार

नेल कटरसोबत असणारा दुसरा ब्लेड थोडा अनिकुचीदार असतो. तो लहान तलवारीसारखे काम करतो. त्याला पुढून थोडा गोलाकार आकार दिला आहे. त्याचा उपयोग नखामध्ये असलेली घाण स्वच्छ करण्यासाठी केला जातो.

नेल कटरसोबत असणाऱ्या ब्लेडमध्ये एक डिझाइन दिले आहे. ते डिझाइन असलेला ब्लेड खूप उपयोगी आहे. त्यामाध्यमातून कोल्ड ड्रिंकच्या बॉटलचे झाकन उघडता येते. त्यामुळे नेल कटर बनवताना किती गोष्टींचा विचार केला गेला आहे, हे लक्षात येते.

नेल कटरमध्ये असलेला आणखी एक ब्लेड चाकू सारखे काम करतो. हलक्या गोष्टी त्या चाकूने सहज कापता येतात. तुम्ही जर प्रवासात जात असाल तर काही कापण्यासाठी त्याचा वापर करता येतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button