Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने आवळला कारवाईचा फास; १८ दिवसांत ३६ लाख दंड वसूल

पुणे :  शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळला आहे. महापालिकेकडून १ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत शहरात दंडात्मक कारवाई केली असून, ४ हजार ५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या कारवाईत सर्वाधिक १८ लाख २१ हजार रुपयांचा दंड सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे. याशिवाय बांधकाम राडारोडा उघडल्यावर टाकल्या प्रकरणी ५ लाख ५८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त संदीप कदम यांनी स्पष्ट केले. स्वच्छता गणवेश न घातल्याप्रकरणी त्यांच्याकडून १७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिकेकडून यापूर्वी शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, दैनंदिन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात प्रभावी कारवाई होत नव्हती. त्यामुळे महापालिकेने इंदोर महापालिकेच्या धर्तीवर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर गस्त पथकांची निर्मिती करून त्यांना स्वतंंत्र वाहने दिली आहेत. अशी १५ पथके असून, त्यासोबतच आणखी तीन पथके परिमंडळ स्तरावर या विशेष वाहनांमधून शहरात गस्त घालतात. त्यांच्यावर शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे आणि त्यांची जनजागृती करणे एवढीच जबाबदारी देण्यात आली असल्याने शहरातील प्रभावीपणे कारवाई होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, धनंजय मुंडेंची चौकशी करा; काँग्रेस नेत्याची मागणी

असा आहे आकारलेला दंड

– रस्त्यावर थुंकणे : १ लाख २६ हजार

– उघड्यावर लघुशंका करणे : ९१ हजार ७००

– कचरा जाळणे – ५५ हजार

– कचरा वर्गीकरण न करणे : १ लाख ५ हजार

– बंदी असलेला मांजा विक्री : २५ हजार ५००

– सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता : १८ लाख २१ हजार २००

– कचरा प्रकल्प बंद असणे : ४० हजार

– बांधकाम राडारोडा : ५ लाख ५८ हजार

– प्लॅस्टिक कारवाई : ७ लाख ५५ हजार

– बायोमेडिकल वेस्ट : १५ हजार

– इतर ५ हजार

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button